Logo
आज सकाळी फाईल ट्रॅकिंग प्रणाली सुरु करताना आवक आणि जावक क्रमांक दुबार झाल्याने ते दुरुस्त करणेसाठी प्रणाली दुपारी २:१५ ते २:४५ बंद राहील.

सूचना

For advance file tracking system (DMS)


For any queries call 1346Inbox मध्ये एकापेक्षा जास्त पत्र किंवा फाईल आल्या असतील तर विविध entry search करून Select केलेल्या entries एकाच क्लिकवर Accept करणेची देणेत आलेली आहे.

एखादा कर्मचारी / अधिकारी यापूर्वीच दुसऱ्या विभागामध्ये समाविष्ट केला गेला असेल व आपल्या विभागामध्ये देखील समाविष्ट करावयाचा असेल म्हणजेच एखादा कर्मचारी / अधिकारी एकापेक्षा जास्त विभागामध्ये काम करीत असेल तर त्या कर्मचारी / अधिकारी यांना प्रणालीमध्ये समाविष्ट करून घेणेसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाकडे संपर्क करावा. (०२०-२५५०६६१७)

आपल्या खात्याकडे inward झालेले तसेच आपले खात्याकडून Outward झालेले किंवा नागरिकांकडून प्राप्त झालेली entry सापडत नसल्यास search मेनूमध्ये Search (in /out) सर्च दिला आहे. यामध्ये सर्व entry सापडतील.

१) दि. १० सप्टेंबर २०१८ पासून नविन फाईल ट्रॅकिंग प्रणाली सुरु करण्यात येणार आहे. त्याची लिंक : http://fts.punecorporation.org

२) जुन्या फाईल ट्रॅकिंग प्रणालीमधील सर्व data नविन प्रणालीमध्ये घेण्यात आला आहे.

३) नविन फाईल ट्रॅकिंग प्रणाली (http://fts.punecorporation.org) चे युजर आयडी आणि पासवर्ड जुन्या प्रणाली (http://dmft.punecorporation.org) प्रमाणेच ठेवण्यात आले आहे.

४) नविन फाईल ट्रॅकिंग प्रणालीचा वर्कफ्लो खात्याकडून - खाते (बारनिशी ते बारनिशी) व खात्याकडून – सेवक असा विकसित करण्यात आला आहे. आपल्या खात्याकडील ज्या सेवकांकडे टपाल जाते त्यांना प्रणालीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे, हे फक्त सेवकाला समाविष्ट करताना एकदाच करावे लागते.

५) सेवकांना प्रणालीमध्ये समाविष्ट करणेसाठी Add Employee वर क्लिक करा. सर्व सेवकांची लिस्ट आल्यानंतर सर्चमध्ये क्लिक करून कर्मचारी यांचे नाव किंवा Employee No. सर्च करून Add Employee बटनवर क्लिक करावे.

६) सेवकांना प्रणालीमध्ये Add करताना एकदाच Add करता होतो त्यामुळे आपल्याकडील टपाल जाणाऱ्या सेवकांनाच Add करावे, सर्व पगारबिलातील सेवकांना Add करण्याची आवश्यकता नाही.

७) सेवकांना फाईल ट्रॅकिंग प्रणालीमध्ये Add करताना त्यांचा मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक आहे. कारण त्यांना प्रणालीमध्ये Add केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर युजर आयडी आणि पासवर्ड व प्रणाली वापरणेसाठी विकसित केलेले ‘PMC Officer Connect’ Mobile App ची लिंक SMS द्वारे जाणार आहे.

८) सदर App Android play store किंवा IOS वर देखील डाऊनलोड करू शकता.

९) सदर प्रणालीमधून आपल्या खात्याकडील सेवकांना पत्रव्यवहार पाठविला जाणार असल्याने त्या अधिकारी / सेवकांना बारनिशी सेवकांनी व आयटी नोडल ऑफिसर यांनी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

१०) प्रणाली वापराबाबत काही अडचण असल्यास होमपेज वरील युजर मॅन्युअलचा उपयोग करावा.

११) प्रणाली वापरणेबाबत काही शंका अथवा अडचण असल्यास http://ftsuat.punecorporation.org या लिंकवर नोंदवावी.

१२) टेस्टिंग करताना Add केलेले सेवक काढून टाकण्यात आले आहेत, तरी त्या सेवकांना पुन्हा Add करून घ्यावे.

१३) ज्या अधिकारी / सेवकांच्या मोबाईलवर अगोदर पासूनच ‘PMC Officer Connect ’ App असेल आणि परंतु ‘FTS’ सेक्शन दिसत नसेल तर त्यांनी आपले मोबाईल App Update करून घ्यावे.

१४) बारनिशी लिपिकाने आपल्या खात्याकडील सेवकांना प्रणाली मधून पत्रव्यवहार पाठविल्यानंतर पत्राची / फाईलची हार्डकॉपी देखील संबंधित सेवकाला पाठवणे आवश्यक आहे. तद्नंतर संबंधीत सेवक पत्राची / फाईलचा क्रमांक आणि एन्ट्री पाहून पत्र / फाईल स्वीकारतील व पुढील कार्यवाही करतील.

अधिकारी / सेवकांसाठी सूचना (Mobile App संबंधी)


१) अधिकारी / सेवकांना नविन फाईल tracking प्रणाली वापरणेसाठी ‘PMC Officer Connect ’ Mobile App विकसित करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी / सेवक यांनी ‘PMC Officer Connect ’ Mobile App Android play store किंवा IOS वरून डाऊनलोड करून घ्यावे.

२) ज्या अधिकारी / सेवकांच्या मोबाईलवर अगोदर पासूनच ‘PMC Officer Connect ’ Mobile App असेल परंतु त्यांना ‘FTS’ सेक्शन दिसत नसेल तर त्यांनी आपले मोबाईल App Update करून घ्यावे.

३) ज्या अधिकारी / सेवकांना नविन फाईल tracking प्रणालीमध्ये Add केले जाईल त्या सेवकांच्या मोबाईलवर सदर FTS प्रणालीचा युजर आयडी आणि पासवर्ड व Mobile App डाऊनलोड करणेची लिंक SMS द्वारे पाठविली जाईल.

४) तद्नंतर SMS द्वारे प्राप्त झालेला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून Mobile App मध्ये लॉगीन करावे.

५) तद्नंतर आपल्या खात्याच्या खातेप्रमुख यांच्याकडून टपालावर शेरे मारून आल्यानंतर आपल्या खात्याच्या बारनिशी लिपिकाकडून आपल्याशी संबंधीत पत्र / फाईलची entry प्रणालीमधून पाठविण्यात येईल. सदर पाठविलेली entry आपल्याकडे सदर पत्र / फाईलची हार्डकॉपी मिळाल्यानंतर सदर entry Inward > Inbox मधून ‘Accept’ मधून ‘Accept’ करावी. व आपल्याशी संबंधित नसेल तर Reject करावी.

६) Accept केलेली फाईल आपल्या inward Register मध्ये दिसेल त्यामध्ये जाऊन सदर पत्र / फाईलवर Action मध्ये जाऊन पुढील कार्यवाही करू शकता.